पालघर ग्रामीण रुग्णालयात कोरोनामुळे ५० वर्षीय रुग्णाचा मृत्यू

0
368

पालघर – योगेश चांदेकर:

पालघरमधे 50 वर्षीय कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने सकाळी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर १५ जणांना कोरंटाईन करण्यात आले आहे. आज सकाळी या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आला होता, रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने आयसोलेशन वार्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत.

सदर रुग्ण हा १७ तारखेपासून घरीच होता. दरम्यानच्या कालावधीत तीनवेळा चाचणीसाठी व उपचारासाठीही पालघर ग्रामीण रुग्णालयात येऊन गेला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने तथा कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता म्हणून आज दि. ३१ मार्च ते ७ एप्रिल २०२० रोजी रुग्ण रहात असलेला संपूर्ण परिसर ८ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here