मुंबई – योगेश चांदेकर

कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात मोठी कपात करण्यात येणार असल्याची घोषणा सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. हा निर्णय थेट वेतन कपाती बाबत नसून हे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. उर्वरित वेतन हे पुढील आदेशानंतर देण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख संबंधित आदेशात असल्याचंही समजते.

या वेतन कपातीच्या निर्णयातून पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या मोठ्या वर्गाला दिलासा मिळणार आहे. कोरोनाविरुद्धच्या प्रत्यक्षातील लढाईत जे सहभागी अशा सर्वांचेच वेतन कायम राहणार आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विट करून आपण याबाबत खात्री केली असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यावर लवकरच स्पष्टीकरण देतील. त्यामुळे याबाबत गैरसमज करून घेऊ नये आणि अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here