धक्कादायक: दिल्लीच्या कर्नल वृद्धाचा पालघरमध्ये मृत्यू!

0
8719

पालघर – योगेश चांदेकर:

दिल्लीतील रिटायर्ड कर्नल वृद्धाचा पालघर तालुक्यातील मनोर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर रुग्ण हा दिल्ली येथील रहिवासी असून तो १४ दिवसांपूर्वी पत्नीसह स्वतःच्या चारचाकीने मुंबईकडे निघाला होता. लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या आपल्या मुलीला घेण्यासाठी ते जात होते. पालघर तालुक्यात मनोर नजीक आल्याने अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारा दरम्यान त्या वृद्ध कर्नलचा मृत्यू झाला. दाखल केले त्यावेळी रुग्णाला ताप होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. रुग्णाचा प्रवास इतिहास पाहता त्याचे स्वॅब टेस्टसाठी कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे आणि योग्य ती खबरदारी म्हणून आता मनोर ग्रामीण रुग्णालय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे अशी माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here