पालघर प्रतिनिधी – जितेंद्र पाटील:

पालघर तालुक्यातील मासवान हायस्कुल येथील माध्यमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला त्यांच्याच शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकाचे पगार बिल तयार करण्यासाठी तसेच सातवे वेतन आयोगचे फरकाचे बिल तयार करण्यासाठी ४०० रूपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी आज गुरुवार रोजी दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक ठाणे यांच्या आदेशानुसार चंद्रकांत विष्णू जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सविस्तर बातमी अशी कि पालघर तालुक्यातील मासवन येथील माध्यमिक हायस्कुल प्रशोगशााळा सहाय्यक यांची सातवा वेतन आयोगा प्रमाणे फरकाचे बिल तयार करण्यासाठी ४०० रुपये मागणी केली. याबाबत प्रयोगशाळा सहाय्यक यांनी मुख्याध्यापक नचंद्रकांत विष्णू जाधव यांनी सेवाखंड क्षमापित करून नियमित वेतनवाढ सुरू करणे बाबत वारंवार विनंती देखील मुख्याध्यापक यांनी वेतनवाढ लागू केली नाही. ४०० रुपये लाचेची मागणी केल्याने प्रयोगशाळा सहाय्यक यांनी पोलीस अधीक्षक ठाणे यांचेकडून सेवाखंड क्षमापित करून त्याप्रमाणे आदेश घेऊन मुख्याध्यापक चंद्रकांत विष्णू जाधव यांचे विरुद्ध तक्रार दिली.

मुख्याध्यापक चंद्रकांत विष्णू जाधव यांनी सेवापुस्तकात नोंद घेऊन त्याप्रमाणे वेतनवाढ नियमित करण्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक यांचेकडून ४०० रूपयांची मागणी केली. दरम्यान प्रयोगशाळा सहाय्यक यांनी याबाबत मुख्याध्यापक चंद्रकांत विष्णू जाधव यांचे विरोधात कारवाई व्हावी, म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकउे लेखी तक्रार दिली. गुरुवारी दुपारी मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांना लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

या सदर प्रकरणाची भारत साळुंखे पोलीस निरीक्षक, मपोह/मांजरेकर, पोना/सुतार, पोना/ सुमडा, पोना/चव्हाण , पोशी/ उमतोल, चापोशि/ दोडे पडताळणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here