मुंबई : ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांचे वडील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. निधनसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. मिळालेल्या माहितीनुसार माधव पाटणकर यांच्यावर अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अल्पशा आजाराने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

माधव पाटणकर हे एक व्यावसायिक होते. रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवली येथील आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे. आज  ट्वीटर वरुन त्यांनी माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here