नगराध्यक्षा डॉ. काळे यांनी मास्क, हॅंडग्लोज व सॅनेटायझरचे केले वाटप

0
473

पालघर। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. सध्याच्या घडीला पालघर मध्ये कोरोना बाधीत रुग्ण नसल्याने जनतेने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतु योग्य ती खबरदारी व काळजी घेणे गरजेचं असल्याचे मत नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे यांनी व्यक्त केलय.

कोरोना व्हायरस पासुन सुरक्षित राहाता यावे, या हेतुने पालघर नगरपरिषद नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे व पालघर सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष केदार काळे यांनी पालघर स्टेशनवर काम करणाऱ्या व जनतेशी सर्वात जास्त संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, हॅंडग्लोज व सॅनेटायझरचे वाटप केले. काळे यांनी कोरोना व्हायरस पासुन आपली व कुटुंबाची कशी काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन केले. सॅनेटाईजर, साबणाने हात स्वछ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर घरच्या घरी आपण कशा प्रकारे सॅनेटायझर बनवु शकतो याचीही माहिती दिली.  

यावेळी, पालघर स्टेशन मॅनेजर मिलींद किर्तीकर, बुकीग सुप्रिटेंडेंट खत्री, सेफ्टी काउन्सिलर रघुवीरसिंग राव, स्टेशन सुप्रीटेंडेंट परेश दादरकर, स्टेशन सुप्रिटेंडेंट  संजय पाटील, श्री परब,  व महीला सफाई कामगार उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here