पालघर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कलाशिक्षकाचे अनोखे समर्थन..!

0
618

पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोनामुळे संचार बंदी सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कलाकारदेखील घरीच बसून आहेत. मात्र कलाकार मिळालेल्या वेळेत ही काही न काही कलाकारी करीतच असतात. अशाच प्रकारे कासा आचार्य भिसे विद्यालयातील कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे एक अनोखे स्केच साकारले आहे.

महेंद्र पवार हे कासा येथील आचार्य भिसे विद्यालयात गेल्या 30 वर्षा पासून कला शिक्षक म्हणून सेवा करीत आहेत, कलेची आवड असल्याने त्यांना अनेक कलाविषयक पुरस्कार मिळाले आहेत. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला नेहमी धीर देत कोरोनाच्या संकटात देखील सामान्य माणसांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करत असल्याने त्यांचे चित्र रेखाटले असल्याचे महेंद्र पवार यांनी सांगितले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पालघरचे लोकसभा खासदार राजेंद्र गावित यांचे पेन्सिल रेखाटन देखील पवार यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य आदर्श कला तपस्वी पुरस्कार, पालघर जिल्हा कला तपस्वी पुरस्कार यांसह अनेक सामाजिक संस्थाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पवार हे पालघर जिल्हा कला अध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. गेल्या 30 वर्षांच्या काळात त्यांनी अनेक शिष्य निर्माण केले, त्यातील अनेक वारली चित्रकार, शिल्पकार, कमर्शियल आर्टिस्ट आहेत. जव्हार येथील आदिवासी भवनावर चितारलेले वारली चित्र हे महेंद्र पवार यांचेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here