पालघर: सुशील चुरी यांच्याकडून जीवितास धोका; वडापाव विक्रेत्याची थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

0
400

मुंबई ई न्यूज नेटवर्क:

पालघर तालुक्यातील बोईसर येथील कुडण या ठिकाणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशु संवर्धन सभापती सुशील चुरी यांनी वडापाव विक्रेत्याला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीचे वृत्त मुंबई ई न्यूज ने एक्सक्लूजिव्हली प्रसिद्ध केले होते. याच रागातून सुशील चुरी यांनी सूडबुद्धीने मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याबाबत तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे वृत्त ताजे असतानाच मारहाण झालेल्या वडापाव विक्रेत्याने थेट पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुशील चुरी यांच्यापासून आपल्यासह कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे या तक्रारीत सांगण्यात आले आहे.

काय आहे मारहाणीचे प्रकरण :

सुशिल चुरी आणि त्यांच्या समर्थकांनी गाडी पार्किंगच्या वादातून कुडण येथील दिव्यांग वडापाव विक्रेता सुनील चुरी यास बेदम मारहाण केली होती. सुनील चुरी हे १९९८ सालापासून वडापावचा व्यवसाय करतात. वडापावची गाडी हेच त्यांच्या आर्थिक कमाईचे एकमेव साधन असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एका मोठ्या राजकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा पध्दतीने कायदा हातात घेत केलेली मारहाण चुकीची आहे. दिवसाढवळ्या अशी गुंडागर्दी करून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या मारहाणी बाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर जिवाच्या भीतीने वडापाव विक्रेत्याने अखेर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

सत्तेचा वापर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन सभापती सुशील चुरीस यांच्यावर कारवाई करा….

दिव्यांग वडापाव विक्रेत्यांवर जीवघेणा हल्ला करीत त्याला व त्याच्या मुलांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याबाबत बातमी करत पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारावरही सुशील चुरी व समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. एकूणच आत्तापर्यंत घडलेल्या घटनांच्या मालिकेचा विचार करता पोलीस प्रशासनाने त्वरित पावले उचलून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here