पालघर: जिल्ह्यातील या भागात प्रवेश बंद; प्रतिबंधित क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषणा

0
390

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणे आवश्यक आहे. यामुळे नागरीक या क्षेत्रा पासून दूर राहून कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यास मदत मिळेल असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण प्रतिबंधित क्षेत्र पुढील प्रमाणे
मौजे सफाळे, ता.पालघर
मौजे उसरणी, ता.पालघर
मौजे काटाळे, ता.पालघर
मोजे.दसरापाडा, गंजा , ता.डहाणू
मौजे कासा, ता.डहाणू
मौजे रानशेत सारणी ता.डहाणू
प्रतिबंधित करण्यात आलेलेक्षेत्र
सफाळे-डोंगरी, सफाळे, उंबरपाडा, कर्दळ या गावाचे क्षेत्र
उसरणी, दांडा,खटाळी या गावाचे क्षेत्र
काटाळे, लोवरे, वाकडी, वसरोली, वांदिवली, खरशेत, मासवण, निहे या गावाचे क्षेत्र,
दसरापाडा, गंजाड, महालपाडा या गावाचे क्षेत्र
कासा गावठाण, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, मातेरापाडा, विठ्ठलनगर, गायकवाडपाडा, काटकरपाडा, घाटाळपाडा या गावाचे क्षेत्र
भोईरपाडा, वरखंडपाडा, वाकीपाडा, सारणीफाटा,सारणी, डोगरीपाडा, करवटापाडा, गावठाणपाडा, मानीपाडा

पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील, या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (ब), भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here