MUMBAI e NEWS :
“आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे भाजपा दिल्ली प्रदेश कार्यालयात प्रकाशन करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

या पुस्तक प्रकाशनावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे देखील उपस्थित असल्याचे समजते. भाजपचे नेते भगवान गोयल यांनी आपल्या फेसबुक व ट्वीटर खात्यावरून पोस्ट वरून हि माहिती मिळते. सोशल मीडियावर भाजपची जोरदार खिल्ली उडताना पाहायला मिळते आहे. मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांबरोबर करणे चुकीचे असल्याचं मत नेटिझन्स व्यक्त करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here