कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वस्त धान्य’ वाटपाबाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

0
401
संग्रहित फोटो

मुंबई। राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. याची माहिती महाविकास आघाडीचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. (corona effect, mahavikas aaghadi desicion)

राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी करण्यात येते. अंत्योदय अन्न योजनेखालील राज्यात २४ लाख ७ हजार ४६२ कुटुंबांना प्रतिमाह प्रतीशिधापत्रिका ३५ किलो धान्य आणि प्राधान्य कुटुंबातील ५ कोटी ४८ लाख ६० हजार ३३१ व्यक्तींना प्रतीव्यक्ती प्रतिमाह ५ किलो याप्रमाणात धान्य देण्यात येते.रु. ३/- प्रतीकिलो दराने तांदूळ आणि रु. २/- प्रतिकिलो या दराने गहू उपलब्ध करुन देण्यात येते.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्यवाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट/अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here