ब्रेकिंग: कोरोनाबाधिताचा थेट संपर्क नसताना डहाणूतील 3 वर्षीय मूलीला कोरोनाची लागण

0
445

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. गंजाड या भागातील एका ३ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर मुलगी कोणत्याही कोरोनाबाधिताच्या थेट संपर्कात आलेली नसताना तिची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे या मुलीला कोरोनाची लागण नेमकी कशामुळे झाली हे शोधावे लागणार आहे.

दरम्यान या मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध सुरु असून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

सदर कोरोनाबाधित हि वीटभट्टी कामगाराची मुलगी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या मुलीच्या थुंकीचे नमुने गेल्या आठवड्यातच चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र त्याचे अहवाल उशिरा मिळाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here