पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना ठीक-ठिकाणी त्याच उल्लंघन होताना दिसून येत आहे. डहाणू तालुक्यातील कासा चारोटी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या बाहेर लोकांनी आज सकाळपासून मोठी गर्दी केली आहे. बँकेच्या बाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सोशल डिस्टेसिंगचा नियम देखील पाळण्यात येत नाही.

बँक कर्मचारी येण्या अगोदरपासूनच या रांगा लागल्या आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील वाघाडी, चारोटी, धानिवरी, तवा, वेतिवरोति या पंचक्रोशीतील लोकांनी बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे. एकूणच काय तर लोक खबरदारीचे उपाय, सूचना पाळताना दिसत नाहीत.