डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा रद्द; शासकीय यंत्रणा व विश्वस्थ मंडळ सभेत निर्णय

0
1943

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या प्रसारामुळे अखेर रद्द करण्यात आली असून शासकीय आदेशानुसार 31 मार्च पर्यंत दर्शन व्यवस्था भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. डहाणू प्रांताधिकारी सौरभ कटीयार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी 3 वाजता महालक्ष्मी मंदिर कार्यलयात शासकीय यंत्रणा व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यात्रा संदर्भात तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डहाणू तहसीलदार राहुल सारंग, कासा सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे, महालक्ष्मी ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, कोषाध्यक्ष वसंत सातवी, कार्यवाह शशिकांत ठाकूर, डहाणू गटविकास अधिकारी भरक्षे, सरपंच पूजा सातवी आदी उपस्थित होते.

डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमा पासुन सुरू होते, तसेच सलग 15 दिवस चालणाऱ्या यात्रेत दरवर्षी याठिकाणी जिल्ह्यातील भाविकाबरोबर मुंबई, ठाणे व गुजरात राज्यातील लाखो भाविक येतात. सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठया प्रमाणात विविध प्रकारची दुकाने , करमणूक खेळ, खाद्य पदार्थ, पाळणे आदी दुकाने थाटली जातात. सादर यात्रा 8 एप्रिल पासुन सुरू होणार होती मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे राज्यात शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली असून पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, सामजिक कार्यक्रम आदि वर बंदी आणली असून पालघर जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदी आदेश 31 मार्च पर्यंत काढला आहे. त्या अनुषंगाने कोरोना बाबत खबरदारी म्हणून 31 मार्च पर्यंत भाविकांना मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले असून. महालक्ष्मी यात्रेनिमित्त येणाऱ्या महाराष्ट्र व गुजरात राज्य परिसरातील भाविकांची येणारी लाखो भाविकांची संख्या लक्षात घेता पुढील उपाययोजना व खबरदारीसाठी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यात्रा कालावधी दरम्यान आंतरीक पूजा मात्र होणार आहे. यावेळी पुजारी व दुकानदार उपस्थित होते.

“शासननिर्णय व जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेश 31 मार्च पर्यंत असलेतरी सद्याची परिस्थिती व यात्रा नियोजन करणे लक्षात घेता 8 एप्रिल रोजी होणारी यात्रा होणे शक्य नाही त्यामुळे ती रद्द करण्यात येत आहे”
सौरभ कटीयार
प्रांताधिकारी डहाणू

“कोरोनाचा प्रसार लक्षात घेता प्रांताधिकारी यांनी आयोजित केलेल्या सभेत पुढील खबरदारी म्हणून चैत्र पौर्णिमाला सुरू होणार देवीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे”
संतोष देशमुख
अध्यक्ष – श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here