हेल्थ टिप्स: दारू, सिगारेट, तंबाखू व्यसन सोडायचे घरगुती उपाय..!

0
2511

मुंबई ई न्यूज नेटवर्क वेब टीम: दारू, सिगारेट अथवा तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन हे शरीरासह मनावर देखील परिणाम करते. सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात सुद्धा व्यसनामुळे अनेक संकटाना तोंड द्यावे लागते. नशेच्या प्रभावाने आपले अनेक चांगले गुण नष्ट होतात यामुळे माणूस आत्मविश्वास देखील गमावून बसू शकतो. यामुळेच तर गमतीने का असेना दारूला ‘स्लो पॉयझन’ तर म्हणत नाहीत ना? महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर अनेक सामाजिक संस्था व्यसनाधीन लोकांची दारू सोडविण्यासाठी काम करत आहेत. दारूचे व्यसन हा मोठा विषय बनला आहे त्यामुळेच अनेकजण ‘पिणाऱ्याला न कळता दारू सोडवा’, ‘दारू सोडविण्याचे औषध’ अशा ना-ना तऱ्हेच्या जाहिराती करून लोकांना लुबाडण्याचे उद्योग करत आहेत, यांतील सर्वचजण बोगस आहेत असं नाही. दारू सोडणे किंवा दारूचे व्यसन सुटणे हे जोवर पिणारा व्यक्ती मनापासून ठरवत नाही तोवर दारू सुटणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

तर आजच्या या लेखात आपण दारु, सिगारेट व तंबाखू सोडण्‍याचे सहज व सोपे घरगुती उपाय काय आहेत याविषयी माहिती घेऊयात. ते पुढील प्रमाणे…

  • दारू पिणाऱ्यास जर वेळोवेळी सफरचंदाचा रस दिला(दिवसातून ३-४ वेळा) तसेच जेवनात सफरचंदाचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटण्यास मदत होते.
  • बटाटा उकडून घेतो त्याप्रमाणे उकडलेले सफरचंद रोज दिवसातून तीन- चारदा घेतल्यास दारूची सवय सुटते.
  • हळदीचे(हळकुंडाचे) बारीक-बारीक तुकडे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा होईल तोंडात टाकून आराम चघळावे. काही दिवसातच विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.
  • सिगारेट सोडण्यासाठी दालचीनी बारीक वाटून मधामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा तयार केलेलं मिश्रण बोटाने चाखावे.
  • कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा असे नियमितपणे सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते.
  • तंबाखू खाण्याची तल्लप झाल्यास काही दिवस तोंडात लवंग चघळल्यास तंबाखूचे व्यसन सुटण्यास मदत होते. उष्णता वाढवणारा मसाल्यातील पदार्थ असल्याने लवंग खाण्याचा अतिरेक होऊ नये.
  • चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास 60 ग्रॅम द्राक्ष वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये काळीमिरची, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. यामुळे लवकरच दारूची झिंग उतरते. मात्र यात मिरचीपूड जास्त होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा जुलाबाचा त्रास होऊन अशक्तपणा येऊ शकतो.
  • एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा उतरण्यास मदत होते.

वरील सर्व उपाय हे माहितीसाठी देण्यात आले आहेत, उपयोग करण्याअगोदर आपल्या डॉक्टरांशी एकदा चर्चा करा. हि माहिती आवडली असल्यास मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांसोबत शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here