दत्तात्रय शिंदे पालघरचे नवे पोलीस अधीक्षक; गौरव सिंग यांची होणार बदली..!

0
734

पालघर – योगेश चांदेकर:

दत्तात्रय शिंदे हे सध्या कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई याठिकाणी कार्यरत असून त्यांची पालघरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शासन आदेशाद्वारे हि माहिती दिली असून कामाच्या ठिकाणावरून त्यांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गड चिंचले साधू हत्याकांड प्रकरणी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे, अद्याप कोणत्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे याबाबत मात्र शासनाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here