पालघर: पोलीस दलातील कर्तव्यदक्ष हवालदाराचा कोरोनाने मृत्यू; संपूर्ण जिल्हा दुःख सागरात..!

0
452

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर पोलीस दलात कार्यरत वालीव पोस्टेचे पोलीस हवालदार किरण साळुंखे यांची कोरोनाशी झुंज आज अपयशी ठरली. साळुंखे हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक देखील दुःखसागरात बुडाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोरोना झाल्याने उपचार सुरु होते.

पोलीस अधीक्षक व पालघर पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी किरण साळुंखे यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनाबाधित पोलीस व कुटुंबियांवर उपचारासाठी वेगळे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here