ब्रेकिंग: पालघरमध्ये कोरोनाचा ४ था बळी; बोईसरमधील त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू.!

0
473

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील दलाल टॉवर भागात राहणाऱ्या 35 वर्षीय कोरोनाबाधित
तरुणाचा ठाणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. सदर रुग्णाचा मुंबई येथील प्रवास इतिहासातून कोरोना लागण झाली होती. सदर रुग्ण हा कुटुंबातील एका सदस्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात घेऊन गेला होता त्यादरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या कुटुंबातील इतर ३ सदस्यांना देखील कोरोना लागण झाली होती.

या रुग्णाच्या मृत्यूमुळे कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ४ वर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here