१७ मे पर्यंत काय चालू आणि काय बंद, वाचा सविस्तर

0
451

केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी देशात दोन आठवड्यांसाठी पुन्हा एकदा तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. मात्र हा तिसरा लॉकडाऊन आधीच्या दोन लॉकडाऊ एवढा कडक नसणार आहे. यावेळी कोरोना व्हायरसच्या तीव्रतेनुसार त्या त्या विभागात लॉकडाऊनचे निर्बंद लादले जाणार आहेत. त्यानुसान ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये काय चालू राहणार?

* रेड झोन

– ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रातील कामे, तसेच मनरेगाची कामे, खाद्य व्यवसाय, वीट भट्टी उद्योग.

– सर्व शेतीची कामे,

– पशुसंवर्धन उद्योग

– पेरणीचे कामे

– आरोग्य सेवा

– बँका, बिगर बँका संस्था, विमा आणि भांडवली व्यवहार करणाऱ्या संस्था, क्रेडिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी

– अंगणवाडी, निराधार आश्रम, वृद्धाश्रम

– सार्वजनिक उपयोगाची साधने. इंटरनेट, मोबाइल, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन

– वृत्तपत्रे, आयटी सेवा, कॉल सेंटर, कोल्ड स्टोरेज, गोदाम, फॅसिलिटी मॅनेजमेंट

– औषध निर्मितीचे कारखाने, औषधांसाठी लागणारा कच्चा माल

*ऑरेंज झोन

– रेड झोनमध्ये सुरु असणाऱ्या सर्व गोष्टी सुरु राहतील.

– तसेच टॅक्सी, रिक्षा यांना परवानगी असेल मात्र ड्रायव्हरसहीत एकाच प्रवाशाला परवानगी असेल.

– आंतरजिल्हा वाहतूकीसाठी परवानगी दिलेल्या वाहनांच वाहतूक करता येईल.

– चार चाकी वाहनामध्ये जास्तीत जास्त दोन प्रवाशी तर दुचाकी वाहनावर एका प्रवाशाला वाहतूक करण्यास परवानगी

  • ग्रीन झोन

– ग्रीन झोनमध्ये सर्वप्रकारच्या व्यवहारांना परवानगी असेल. मात्र सोशल डिस्टसिंगसाठी जे नियम आहेत. ते पाळावे लागणार आहेत.

– सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसमध्ये केवळ ५० टक्के प्रवाशी घेतले जातील.

– सर्व प्रकारची मालवाहतूकीला परवानगी असेल.

– ई-कॉमर्स वेबसाईटना अत्यावश्यक नसलेल्या वस्तू देखील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये डिलीव्हर करता येणार आहेत.

– ज्या गोष्टीवर बंदी घालण्यात आलेली त्या सर्व गोष्टी सुरु राहतील.


लॉकडाऊनमध्ये काय बंद असणार?

झोन स्तरावर बंदी असलेल्या गोष्टींसोबतच देशभरात सर्व ठिकाणी काही गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी सर्व झोन्सना लोगू असेल

– हवाई वाहतूक, रेल्वे, मेट्रो आणि आंतरराज्य रस्ते वाहतूक पुर्णपणे बंद असेल

– शाळा, कॉलेज, विद्यापीठ, हॉटेल, रेस्टाँरंट, सिनेमा हॉल, मॉल, जिम, क्रीडा संकूल, सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक जाहीर कार्यक्रम, सर्व धर्म मंदीर

वाचा – लॉकडाऊन 3.0 साठी राज्य सरकारच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here