पालघर: छोट्या शौर्यची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु. 14 हजारांची मदत!

0
485

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाविरोधातील लढाई सुरू असतानाच त्यासाठी आर्थिक निधीची चणचण होऊ नये म्हणून सरकारसह सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्योगपतींपासून सर्वसामान्य जनताही सहभाग नोंदवत आहेत. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या शौर्य या चिमुकल्याचा वाढदिवस १४ मे ला होता. आपल्या वाढदिवसानिमित्त साठवलेले पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा मानस व्यक्त केला.

चिमुकल्या शौर्यच्या हट्टानुसार 14 मे या त्याच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त सागर कुटुंबीयांतर्फे कोविडसाठी स्थापित मुख्यमंत्री सहायता निधीला रु. 14 हजार रकमेच्या मदतीचा धनादेश वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्याकडे शौर्यच्या हस्ते सुपूर्त केला. यामुळे चिमुकल्या शौर्यवर वसईतील सोशल मीडियावरील नेटिझन्सनी चांगलेच कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here