तारापूरात डीआरआयची धाडः ९० लाखाच्या ईफेड्रिन ड्रग्जसह ५ कोटींचा मुद्देमाल जप्त; कंपनी मालकासह दोघांना अटक

0
415

पालघर। (योगेश चांदेकर) तारापूरात डीआरआयने 90 लाखाचे ईफेड्रिन ड्रग्ज पकडले असून कंपनी मालकासह दोघांना अटक केली आहे. एनडीपीएस अधिनियम, १९८५ अन्वये मादक द्रव्ये आणि सायकोट्रॉपिक पदार्थांविरूद्ध केल्या जाणाऱ्या कारवाई अंतर्गत डीआरआयच्या मुंबई विभागाने १७ मार्च रोजी ही कारवाई केलीय. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे. जगदंबा केमिकल्स, प्लाट नंबर टि – ८८, एमआयडीसी तारापूर येथे गुन्हा दाखल करत द्रव आणि स्फटिक स्वरूपात 483.53 किलोग्राम इफेड्रिन नावाचे ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. 

मे. जगदंबा केमिकलमध्ये इफेड्रिनचे उत्पादन चालू असल्याबाबची खाञी झाल्यानंतर हि सापळा कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जवळपास रूपये ८९ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल व रोकड जप्त करण्यात आली आहे. तर ५ कोटी रुपये किमतीचा द्रव व स्फटिक स्वरूपातील कच्चामाल जप्त करण्यात आला आहे. 

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, कार्टेलने मोडस-ऑपरेंडी विकसित केली होती, या फॅक्टरीच्या जागेवर ते जॉब वर्क करित असल्याचे दाखवून फॅक्टरी मालकास याच्या मोबदल्यात (भाड्यापोटी) पेमेंट करीत असल्याचे दाखविण्यात येत होते. परंतु या ठिकाणी इफेड्रिनचे उत्पादन घेतले जात होते. यातील आरोपी अत्यंत चलाख असल्याने ते लवकरच हे ठिकाण बदलून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्याच्या तयारीत होते. त्यांचा हा डाव हाणून पाडत कारवाई केल्याची माहिती डीआरआयने दिली आहे. 

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डीआरआयची हि दुसरी मोठी यशस्वी सापळा कारवाई असली तरी अमली पदार्थ विरोधी पथकाने हि अनेक वेळा तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांवर व उद्योजकांवर कारवाई केली आहे. कमीत कमी वेळेत अधिक पैसा कमवीण्याचा हव्यास व मुंबई सारखी अमली पदार्थ सेवन करणाऱ्या ग्राहकांची मोठी बाजारपेठ, स्वत:च्या ऐशो आरामासाठी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक लहान लहान उद्योग व उद्योजक बेकायदेशिरपणे अमली पदार्थांच्या उत्पादनाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. 

या प्रकरणी डीआरआयने आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढिल तपास डीआरआय मुंबई विभाग करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here