…अन चंद्रकांतदादा पाटलांना खुर्चीनेच पाडले तोंडावर!

0
357

MUMBAIeNEWS:

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तावातावाने बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खुर्चीचा पाय तुटल्याने त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आलीय. आज (१२ फेब्रुवारी) सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

“राज्यात गोंधळलेले सरकार आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा महिलेला जाळलं जात आहे. आधीच्या सरकारमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले होते”, असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सोलापूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील हे पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस केंद्रीय मंत्रीपदाचा कारभार स्वीकारणार आहेत अशी चर्चा सुरु आहे, यावर उत्तर देत असताना अचानक त्यांच्या खुर्चीचा पाय तुटला. त्यामुळे त्यांचा तोल गेल्याने ते कोसळल्याचे दिसत आहे. यावेळी बाजूला उभे असलेले सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पाटील यांना आधार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here