पालघर – योगेश चांदेकर:
पालघर- सोमवार (दि. 6 एप्रिल) मध्यरात्री 12.18 मिनीटांनी पालघर जिल्ह्यातील सावरोली, कोचाई, बोरमाळ आदि भागात भूकंपाचा आजपर्यंतचा सर्वात जोरदार झटका जाणवला. भूकंपाचा धक्का इतका जोराचा होता की यामुळे अनेक घराच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असल्याचे समजते.

अनेकांनी जिवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला. या भूकंपामुळे पालघर जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता हे अद्याप समजू शकले नाही.
या अगोदर याच आठवड्यात बुधवारी(दि. १ एप्रिल) रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी आणि शुक्रवारी रात्री ११ वाजता डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात भूकंपाचे लागोपाठ दोन धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवण्याची गेल्या आठ दिवसांतील ही तिसरी वेळ आहे.