मुंबई ई न्यूज नेटवर्क: घरात काही कार्यक्रम असेल अथवा लांबचा प्रवास करायचा असेल तर स्त्रियांना मासिक पाळी कटकटीची वाटते. मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास हे तर यासाठी कारण आहेच पण घरात सण उत्सवाच्या, कार्यक्रमाच्या कामांची बहुतांश जबाबदारी महिलांवरच असते. त्यामुळे ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी अथवा कुठं जायचं असेल तर त्यांना प्रवासात मासिक पाळी येण नको वाटत. प्रवासात पुरेशा सुविधा मिळणार नसल्याने अथवा जास्त प्रमाणात होणारा त्रास यांमुळे त्या मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. यामुळे पाळी पुढे जाऊन तात्पुरती अडचण टळते परंतु नंतर स्रियांना या गोळ्याच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलावी म्हणून स्त्रिया ज्या गोळ्या घेतात त्याचा शरीरावर नक्की काय परिणाम होतो हे पाहुयात आपल्या या आर्टिकलमध्ये.
मासिक पाळी पुढे ढकलावी म्हणून गोळ्या घेतल्यावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे
- या गोळ्या घेतल्यामुळे चेहऱ्यावर केस यायाला लागतात. आणि शरीरातील हार्मोन्स खूप तेजीने वाढतात. यामुळे मासिक पाळी, गर्भधारणेसंदर्भातील इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
- अशा गोळ्यांमध्ये progesterone असतात. त्यामुळे त्याचा दुष्परिणाम progesterone चे प्रमाण वाढल्यासारखाच असतो. तसेच यामुळे ब्लोटींग. अॅक्ने वाढणे, मूड स्विंग होणं अशा समस्या वाढतात.
- ३० वर्ष वयावरील स्रियांनी या गोळ्या घेतल्यास त्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
- या गोळ्यांनी हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने ज्या स्रियांना मधुमेह आहे. त्या स्रियांनी या गोळ्या घेणे टाळावे.
- या गोळ्या खाल्याने स्रियांना चक्करही येऊ शकते.
- वारंवार या गोळ्या घेत राहिलात तर तुमच्या लिव्हरवरही परिणाम होऊ शकतो.
- गोळ्या घेतल्याने काही स्त्रियांना ब्लडींन्ग व्हायला लागत. आणि पोट खूप दुखते.