IMPACT – पालघर: त्या रुग्णासंबंधी मंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य प्रशासनाला दिला हा आदेश!

0
491

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील सफाळे भागातील डोंगरे येथील विजया जगदीश पाटील (वय ४५) यांना आठवड्यातून तीनवेळा दहिसर येथील नवनीत हॉस्पिटलमध्ये डायलेसिससाठी जावे लागत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची तात्काळ दाखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांच्याशी संपर्क साधत रुग्णासंबंधी माहिती घेतली. शिंदे यांनी तात्काळ कार्यवाही करत पालघर आरोग्य प्रशासनाला त्या रुग्णास नजीकच्या रुग्णालयात डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला रुग्णाची व कुटुंबीयांची अडचण लक्षात घेत पालघर तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांना पालघरमध्येच डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. तालुका आरोग्य अधिकारी खंदारे यांनी त्या रुग्णास पालघरमधील ढवळे हॉस्पिटल येथे डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. याबाबत संबंधित हॉस्पिटलला कळवण्यात आले असून रुग्णाच्या नातेवाईकांना देखील याबाबत अवगत करण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी खंदारे यांनी सांगितले. तात्काळ दखल घेत मदतीच्या सूचना दिल्याबद्दल विजया पाटील व कुटुंबियांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here