जिल्ह्यातील पाणी टंचाई वर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे – गुलाबराव पाटील

0
501

पालघर : योगेश चांदेकर –

जल जीवन मिशन हे आंदोलन असून हे प्रत्येक घरात पाणी पुरवण्यासाठीचे हे मिशन राबवून जिल्ह्यातील पाणीटंचाई चा प्रश्न सोडवायचा असल्यास सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पालघर जिल्हा दौरा दरम्यान पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. पाणीटंचाई हा पालघर जिल्ह्यातील भीषण प्रश्न असून जिल्हाधिकारी यांच्यासोबत पूर्ण यंत्रणा या मिशन मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांनी उपमुख्य कार्यकारी तथा गटविकास अधिकारी, अधिकारी यांना मार्गदर्शन करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यात समाविष्ट करून घेतले पाहिजे असे मतही या वेळी त्यांनी व्यक्त केले. तसेच पाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित प्रश्नांचा येत्या दोन महिन्यात योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा असे निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रगतीपथावरील कामांचा घोषवारा, कामाची संख्या, आर्थिक दृष्ट्या पूर्ण कामे, भौतिक दृष्ट्या पूर्ण योजना, भौतिक प्रगती, कामे पूर्ण करण्याचे नियोजन तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील प्रगतीपथावरील योजनांची माहिती, जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावीत योजनांची माहिती, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा, पाणीपट्टी वसुली अहवाल , इत्यादी योजनांबद्दल विस्तृत आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीतस खा. राजेंद्र गावित जि. प.अध्यक्ष भारती कामडी, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे
आ. सुनील भुसारा आ. राजेश पाटील आ.श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आर.विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.एस के. सालीमठ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, प्रकल्प अधिकारी प्रजित नायर, पाणी पुरवठा प्रधान सचिव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here