पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघातात माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू!

0
403

मुंबई – योगेश चांदेकर :

मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस नजीकच्या वैतरणा नदीवरील पुलाच्या कठड्याला इनोव्हा कार धडकल्याने अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. ओवेस लुलानीया (वय.22) असे मयत कार चालकाचे नाव असून तो पालघरचा रहिवासी होता.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कार पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाल्याने चालक कार मध्ये अडकून पडला होता. दोन क्रेनच्या साहाय्याने मयत कार चालकाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. मयत कार चालक पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक जावेद लुलानीया यांचा मुलगा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here