धारावीतून आलेल्या इसमाबद्दल प्रसारित संदेशाबाबत पालघर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण!

0
441

पालघर – योगेश चांदेकर:

धारावी येथील एक इसम दि. ५ एप्रिल रोजी बोईसर येथे मोटार सायकलवरून आला होता. त्याला सामान्य खोलला जाणवत असल्याने तो तपासणीसाठी स्थानिक डॉक्टरकडे गेला होता. स्थानिक डॉक्टरने या गोष्टीची कल्पना तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्यानंतर आरोग्य पथकाने (RRT Team) सदर इसमाला ग्रामीण रुग्णालय पालघर येथे दाखल केली. सदर रुग्णामध्ये कोविड १९ ची लक्षणे नाहीत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून थुंकी नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सदर रुग्णाला आयसोलेट करण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सदर रुग्णाबाबत सोशलमिडीयावर मोठ्याप्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. त्या रुग्णाला कोरोना लागण झाल्याची लक्षणे दिसून येत नाहीत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कोरोनाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवू नये अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here