पालघर: तारापूर औद्योगिक वसाहत टी झोनमध्ये भीषण स्फोट

0
427

पालघर – योगेश चांदेकर:

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये टी झोनमध्ये असलेल्या नंडोलिया केमिकल्स या कंपनीमध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. रासायनिक प्रक्रियेदरम्यान हा औद्योगिक वसाहतीच्या टी झोन मध्ये स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सदर स्फोट इतका मोठा होता कि या स्फोटाचा आवाज साधारणतः पंधरा किलोमीटर दूर असणाऱ्या पालघर शहर परिसरात देखील ऐकू आला.

या स्फोटाची माहिती मिळताच बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे यांनी त्वरित घटनास्थळाकडे धाव घेतली. स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर भागातील किनारपट्टीच्या काही गावांमध्ये सौम्य धक्का जाणवला. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमुळे एकच घबराट पसरली. या स्फोटामध्ये जीवित हानी झाली का हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here