पालघर: फडणवीसांचे ते पत्र अधिकृतच; जिल्हा भाजपकडून खुलासा..!

0
961

पालघर – योगेश चांदेकर:

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याकडे केली होती. याबाबतची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केल्यानांतर समाज माध्यमांवर काही जणांकडून हे पत्र अधिकृत आहे का? याचा जिल्हा भाजपने खुलासा करावा असा निनावी संदेश जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला होता.

दरम्यान मागील काही दिवसांपासून सन्माननीय विरोधीपक्षनेत्यांचे पत्र बनावट/खोटे असल्याचा निनावी संदेश समाज माध्यमांवर काही जणांकडून जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला होता. याबाबत जिल्हा भाजपने खुलासा करावा असेही त्या निनावी संदेशात म्हंटले होते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना लिहलेले ते पत्र खरे असल्याचा खुलासा आज भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केला आहे. तसेच याबाबत गैरसमज निर्माण करण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्याचे काम करत असल्याचे त्यांनी या खुलाशात म्हंटले आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पत्रावरील खुलाशामुळे एकूणच जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here