MUMBAI e NEWS :
एप्रिल 2018 मध्ये येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनोहर भिडे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं विधान केलं होते. या विधानामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

या विधानावर मनोहर भिडे यांच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. 2018 मध्ये आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यांच्या विरोधात बेळगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात झालेल्या सर्व सुनवाईला भिडे उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे न्यायालायने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी ही 24 मार्च रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here