IMPACT पालघर: …अखेर विराजचा वीज आणि पाणीपुरवठा प्रशासनाकडून खंडित!

0
514

पालघर – योगेश चांदेकर:

लॉकडाऊन सुरु असताना जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद ठेवण्यासंबंधी दिलेले आदेश धुडकावून बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाइल कंपनीचे सातत्याने उत्पादन सुरू होते. याबाबतची बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर तसेच स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी बंद करण्याचे आदेश देऊनही या आदेशाला हरताळ फासत कंपनी सुरू ठेवली होती. आज पुन्हा एकदा याबाबतचे वृत्त मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत आज प्रशासनाकडून कडक पावले उचलत कंपनीचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई ई न्यूजने हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते.

दरम्यान संपूर्ण देशात संचारबंदी वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. ग्रीन, ऑरेंज, रेड असे झोन जाहीर करून खबरदारीची योग्य ती उपाययोजना केली जात आहे. असे असताना बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज प्रोफाइल ही स्टील उत्पादन करणारी कंपनी सुरू असल्याची व या कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार नियम न पाळता कार्यरत असल्याची बाब समोर आली होती. यानंतर पालघर जिल्हाधिकारी यांनी उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतरही आज उत्पादन सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे… ह्या बाबत पालघर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता चौकशी करून तस असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असही त्यांनी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here