पालघर – योगेश चांदेकर :

पालघर जिल्हा शिक्षण विभागाचे वरीष्ठ लेखाधिकारी कार्यालय व भविष्य निर्वाहनिधी पथक स्वतंत्र कार्यालय पालघर येथे स्वतंत्रपणे सुरु व्हावे ह्या मागणी साठी पालघर – ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघने दिनांक १३ पासुन पालघर येथे साखळी उपोषण सुरु केले होते.

आजचा तिसरा दिवस खसदार राजेंद्र गावित दिल्ली लोकसभा अधीवेशन संपताच थेट पालघर येथे येउन उपोषण करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ह्याना भेटले व मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी मंत्रालय स्तरावर संघटनेच्या पदाधिकार्याना घेउन जाऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले, व तिन दिवस चाललेले साखळी उपोषण फळांचा रस देउन सोडवले तेव्हा जिल्हापरिषद डेप्युटी सिइओ वाघमारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here