धक्कादायक: महिला पोलिस अधिकाऱ्यावरच गोळीबार!

0
417

पालघर-योगेश चांदेकर

नोव्हेल्टी हॉटेल जवळ सहाय्यक पोलिस निरीक्षक, गुन्हे अन्वेषण शाखा वसई सिद्धवा जायभाये यांचेवर अज्ञात इसमाने एक राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती मिळाली असून सदर हल्लेखोर विरार फाटा दिशेने काळ्या रंगाच्या पल्सर या गाडीवरून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.

हल्लेखोराने तोंडाला मास्क लावलेला होता तसेच अंगावर फुल्ल रेड ब्लॅक जाकीट होते अशी माहिती मिळत आहे? त्या सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण शाखा वसई येथे कार्यरत आहेत. सुदैवाने या गोळीबारात त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती मिळतेय. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला शोधण्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here