पालघर – योगेश चांदेकर:

संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यांपासून जास्त कालावधी झाला लॉक डाऊन सुरु आहे. केंद्र आणि राज्यसरकारने अनेक गरजूना अन्नधान्य व इतर गरजेच्या मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. मात्र अद्यापही हि मदत काही ठिकाणी पोहोचण्यास अडचण असेल वा मिळालेली मदत अपुरी असेल अशाठिकाणी सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होत. या आवाहनानुसार ठाणे-पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष दशरथ संखे यांनी समाजातील गरजुंना मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत वंजारी समाज हितवर्धक संस्थेचे उपाध्यक्ष वैभव संखे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख व संतोष संखे यांना दापोली गावात अद्याप योग्य मदत मिळाली नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी उपसरपंच हेमंत संखे यांच्याशी संपर्क साधत दापोली गावातील वयोवृद्धांची माहिती घेत दुकानांची संख्या आणि त्यांना बाजारहटासाठी होणारी अडचण यांचा विचार करत संपूर्ण गावालाच स्वखर्चाने जीवनावश्यक अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार रविवारी दापोली गावातील लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्याच्या वाटपासाठी उपसरपंच हेमंत संखे यांनी वारंवार आग्रह धरला होता. याप्रसंगी मुकेश संखे, जयवंत संखे हे समाजसंस्थेच्या वतीने उपस्थित होते. दापोलीतील शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना उपशाखाप्रमुख, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर अन्न धान्य वाटपाचा कार्यक्रम सोशल डिस्टंन्स नियमांच्या अधीन राहत करण्यात आला. धान्य वाटपानंतर दापोली सरपंच मनस्वी संखे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.

दरम्यान दरम्यान वैभव संखे यांनी गरजूंना स्वखर्चातून मदत करण्याचा सपाटाच लावला आहे. स्वखर्चातून प्रशासनाला पाच टन अन्नधान्य देणे असेल अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लाखोंचा निधी देणे असेल सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा असे नाही मात्र आजही वंचित असणाऱ्या हजारो लोकांना मदत करण्याचे कार्य करण्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळावी हाच एक प्रामाणिक उद्देश..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here