TikTok साठी काहीही…

0
444

MUMBAI e NEWS :
अनेक तरुण टिक टॉक करण्यासाठी अनेक स्टंट बाजी करत असतात. तरुणाईला टीक टॉक व्हिडिओचं तुफान वेड लागलं आहे. त्यासाठी अगदी जीव धोक्यात घालून अनेकदा व्हिडिओ तयार केले जातात. असाच एक स्टंट तरुणाच्या जीवावर बेतला असता, मात्र तरुण त्यातून वाचला आहे.

हा तरुण टिक टॉकवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्टंट करत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ह्या तरुणानं थेट एक्स्प्रेसच्या दारात उभं राहून टिक टॉकवर अपलोड करण्यासाठी स्टंट केला आणि तरुणाचा अचानक हात सुटला आणि तोल जाऊन तरुण रेल्वेखाली आला. मात्र दैव बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ क्रांती कानेटकर यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून ट्विट करत ही बाब समोर आणली आहे. टिक टॉक च्या वापराचा अतिरेक होतोय आणि तरुण पिढीचा अधिकाधिक वेळ वाया जातोय या कारणास्तव बंदी घालण्यात आलेलं ऍप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here