मोनिका मोरे हिच्या उपचारावरील पैसे जमा करण्यासाठी ग्लोबल रूग्णालयाचा नवा उपक्रम

0
366

मुंबई – योगेश चांदेकर :
मुंबईतील कुल्याँत राहणार्‍या २४ वर्षीय मोनिका मोरे हिच्या दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. २६ ऑगस्ट रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर आता मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बर्‍याच वर्षांनी खरेखुरे हात मिळाल्याने तिला पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची उमेद मिळाली आहे. पण शस्त्रक्रियेसाठी लागलेला खर्च जमा करण्यासाठी आता मोनिकाच्या मदतीला परळ येथील ग्लोबल रूग्णालय धावून आले आहे. या रुग्णालयानं पैशांची जमवाजमव करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यात सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीसाठी काऊंड फंडिंग सुरू केली आहे.

२०१४ मध्ये घाटकोपर येथील रेल्वे अपघातात मोनिकाने तिचे दोन्ही हात गमावले होते. ती कित्येक वर्ष कृत्रिम हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगत होती. परंतु, चेन्नईतील ३२ वर्षीय मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहेत. चॉर्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले होते. रात्री उशीरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली होती. साधारणतः १६ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मोनिकाला चार आठवड्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. या मोनिकाला पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरूवात करण्यासाठी तिला आथिँक मदत मिळावी म्हणून ग्लोबल रुग्णालयाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

फेसबुक या सोशल मीडियावर ही मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून रूग्णालयाच्या फेसबुक पेजला लाईक करून मोनिकाच्या उपचारासाठी प्रत्येकाने इच्छेनुसार १० रूपये द्यायचे आहे. हा जमा होणारा सर्व पैसा मोनिकाच्या उपचारासाठी केला जाईल. #UseHeart असं या मोहिमेला नाव देण्यात आलं आहे. ही मोहीम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबईतील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ‘‘मोनिकाला पुर्वीप्रमाणे आयुष्य जगता यावेत, यासाठी येत्या काही महिन्यांत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. आम्ही खूप आनंदी आहोत की मोनिकाचे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. या मोहिमेच्या माध्यमातून जमा होणारा संपूर्ण निधी हा मोनिकाच्या उपचारासाठी वापरला जाईल.’’

ग्लोबल रूग्णालयातील (मुंबई) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर म्हणाले की, ‘‘दोन्ही हातांचे प्रत्यारोपण हे मोनिकाला नवीन आयुष्य देण्याची पहिली पायरी होती. परंतु, प्रत्यारोपणानंतर काळजी घेणं ही अत्यंत गंभीर व आवश्यक आहे. यासाठी खूप प्रयत्न करण्यासाठी गरज आहे. मोनिकाचे पुढील आयुष्य उत्तम रहावे, याकरता उपचारासाठी लागणारी आर्थिक मदत पुरवण्याकरता ग्लोबल रूग्णालयाने सोशलमिडियाद्वारे काऊंड फंडिग सुरू केली आहे. तिला उपचारासाठी पैसे मिळावेत, असा या मोहिमेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी मुंबईकरांना आवाहन आहे की, फेसबुक पेज लाईक करावे आणि मोनिकाला पाठिंबा द्यावा. जेणेकरून ती आणखीन चांगल आयुष्य जगू शकेल.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here