पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना जागतिक संकट काळात लॉकडाऊनमुळे शाळांना सक्तीची सुट्टी असल्याने प्रत्यक्ष वर्गावर्गातील अध्ययन व अध्यापन पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील खानिवडे केंद्राचे केंद्रप्रमुख विलास शेलार ह्यांनी THE BOMBAY COMMUNITY PUBLIC TRUST (BCPT) द्वारे ENGLISH E TEACH प्रकल्पांतर्गंत, घरोघरी इंग्रजी – 30 दिवसांचे आव्हान अन्वये महाराष्ट्र शासनाच्या मराठी माध्यमांच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता पहिली ते पाचवी साठी ऍनिमेटेड व्हिडीओची लिंक दररोज व दिवसनिहाय, केंद्रातील सर्व शाळांतील सर्व शिक्षकांचा समावेश असलेल्या प्रशासकीय व्हाट्सअप गृपमध्ये पाठविण्यास सुरुवात केली.

सदर बाबीचे महत्त्व ओळखून केंद्रातील पहिली ते आठवी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळा भारोळचे मुख्याध्यापक मनोज मुकूंद राऊत यांनी, गावपाड्यातील सर्व व्हाट्सअप धारक पालकांचा व ग्रामस्थांचा गृप तयार केला आहे. त्या ग्रुपवर सदरचे युट्युबवरील व्हिडीओ पाठविण्यास सुरुवात केली.

ह्या मोफत इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमाच्या 30 दिवसांच्या समाप्तीनंतर भारोळ सारख्या ग्रामीण भागातील, ह्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच चांगला बदल घडून आलेला असेल, ह्यात शंकाच नाही.

  • “विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्लिशची भीती दूर व्हावी, त्यातच कोरोनाच्या सवटात मनस्थिती संतुलित ठेवण्यासाठी मदत होईल या उद्देशाने सुरुवात केली होती. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा व पालकांचा अतिशय चांगला प्रतिसाद सध्या मिळत आहे.” – मनोज राऊत (मुख्याध्यापक – जिल्हा परिषद शाळा भारोळ)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here