पालघर: अत्यावश्यक सेवेत कार्यरत ‘देवदूतांना’ ग्रामपंचायतींचा अजब फतवा..!

0
386

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील ग्रामदान मंडळ वाकी यांनी अजब फतवा काढल्याची धक्कादायक अन तितकीच शरमेची घटना समोर आली आहे. पोलीस कर्मचारी ड्युटीवर जात असल्याने निलेश भुसारा या पोलीस कर्मचाऱ्याला विक्रमगड मधील वाकी ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. यांना अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या देवदूतांना ड्युटीवर गेल्यास राष्ट्रीय आपत्ती कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

आरोग्य सेविकेने कामावर जाऊ नये म्हणून आरोग्य सेविकेसह परिवाराला कुंर्झे ग्रामपंचायत येथील काही निवडक लोक दमदाटी करत असल्याची तक्रार लतिका काटकरी यांनी पोलीस निरीक्षक विक्रमगड पोलीस स्टेशन यांच्याकडे दिली आहे. लतिका काटकरी या वसई – विरार महानगरपालिकेतील बोळींज आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत.

अत्यावश्यक सेवा सुरू असताना देखील विक्रमगड मधील ग्रामपंचायतींचा तुघलकी कारभार सुरु असल्याचे दिसत आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी स्वतः जीवापाड मेहनत घेत शासनाला सहकार्य करत असताना ग्रामपंचायतींकडून अशाप्रकारची नोटीस बजावणे आणि ग्रामस्थांकडून सेवा बजावण्यास विरोध होणे दुर्दैवी असल्याचे मत आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांकडून व्यक्त केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here