पालघर : योगेश चांदेकर –

डहाणू तालुक्यातील चिखले, नरपड आणि आशागड अशा ३ ग्रामपंचायतींचा पदभार ज्यांच्याकडे असे वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोज सारंगधर इंगळे! एकाही ग्रामपंचायतीच्या मुख्यालयात रहात नाही. जेव्हा जमेल तेव्हा एम एच ४८ ए डब्ल्यू २०५९ क्रमांकाची मारुती डिझायर कार घेऊन येतो. खाजगी चालक ठेवलेला आहे. हा चालक वाहनही चालवतो आणि त्याच्या नावावर खोटी बिले देखील फाडता येतात. गाडीच्या दर्शनी भागात महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली असते. त्यामुळे टोल वाचवण्यास मदत होते. वेळ प्रसंगी गाडीत शिट्टीचा झेंडा लावून फिरतो. मी बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता असल्याची बतावणी करतो. त्याच्याकडे रिव्हॉल्वर असल्याचे देखील काही लोकांचे म्हणणे आहे. डहाणूचे गटविकास अधिकारी भराक्षे हे त्याचे मामा असल्याचा त्याचा दावा आहे. त्यामुळे तालुक्यातील हा दादा ग्रामसेवक आहे. नरपड ग्रामपंचायतीमध्ये भोये नावाच्या ग्रामसेवकाची बदली झालेली असताना त्याना पदभार न देता इंगळेला अतिरिक्त पदभारामध्ये ठेवून भोयेना रायपूर ग्रामपंचायतीचा पदभार देण्यामागे मनोज इंगळेचा नक्कीच कोणीतरी गॉडफादर प्रशासनात असणार आहे किंवा इंगळे नक्कीच संबंधितांना काहीतरी मलिदा देत असणार. कोणाच्या वरदहस्ताने मनोज सारंगधर इंगळे हा मनमानी करतो हे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी शोधणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here