आरोग्य: वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, निरोगी राहण्याची नामी युक्ती!

0
579

मुंबई ई न्यूज वेब टीम:

कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे, जगभरातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे. इष्टतम आरोग्य राखण्यात शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. व्याधीवर नियंत्रण हे व्याधीचे उपचार करण्यापेक्षा कधीही चांगले असते. आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे कोणतेही औषध नाही. कोरोना विषाणूचे संक्रमण हा सध्या सर्वात दुर्धर आजार आहे. या काळात आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला चालना देणारे उपाय करणे चांगले होईल.

कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वत:बद्दल जागरुक आणि शरीराशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन निरोगी रहा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. तसेच आयुर्वेदात वर्ण केलेले दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे पालन करण्यास सांगितलेले आहेत. आयुष मंत्रालयाने श्वसन केंद्र आरोग्याच्या संदर्भात विशेष प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय आयुर्वेदिक साहित्य व वैज्ञानिक प्रकाशने यावर आधारित आहेत.

सामान्य उपाय : दिवसभर गरम पाणी प्या, कमीतकमी ३० मिनिटांसाठी योगासन, प्राणायाम आणि ध्यान धारणा करावी. हळद, जिरे, धने आणि लसणचा जेवणामध्ये वापर करावा.

आयुर्वेदानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढवणे : च्यवनप्राश ३० ग्रॅम एक चमच सकाळी घ्या. मधुमेह असलेल्यांनी शुगर फ्री च्यवनप्राश घ्यावे. दिवसातून एक किंवा दोनदा तुळशी, दालचिनी, काळी मिरची, सुंठ (कोरडे आले) आणि मनुका टाकून बनविलेला हर्बल चहा / काढा प्यावा. आवश्यक असल्यास गूळ (नैसर्गिक साखर) आणि ताजा लिंबाचा रस टाकावा. अर्धा चहाचा चमचा हळद चूर्ण १५० मिली गरम दुधात टाकून दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या. याला गोल्डन मिल्क (सुवर्ण दूध) म्हणतात.

सोपे आयुर्वेदिक कर्म : तीळतेल, नारळतेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळ आणि संध्याकाळी लावा. याला प्रतिमर्श नस्य म्हणतात. एक चमचा तीळतेल किंवा खोबरेल तेल तोंडात घ्या. गिळू नका, २ ते ३ मिनिटे तोंडात फिरवा आणि त्यानंतर थुंकून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याच्या गुळण्या करा. दिवसातून एकदा किंवा दोनदा हे करता येते.

कोरडा खोकलाघशा खवखवणे या अवस्थेमधे : ताजे पुदीनाची पाने किंवा अजवाईन यांचे स्टीम इनहेलेशन (वाफ) दिवसातून एकदा घ्या. खोकला किंवा जळजळ झाल्यास लवंग पावडर मधात मिसळून दिवसातून तीनदा घ्यावे. सामान्यत: कोरडा खोकला आणि घसा खवखवणे यावर या उपाययोजना केल्यास आराम होतो. तथापि ही लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here