मुंबई ई न्यूज वेब टीम:
वाचकहो आम्ही आपल्यासाठी बातम्यांसोबतच इतर महत्वपूर्ण दर्जेदार माहिती घेऊन येत असतो. ‘आजीबाईचा बटवा’ (aajibaicha batava) या सदराद्वारे आम्ही हि माहिती आपल्यापर्यंत पोहचवत असतो. या भागात आपण कोरफडीच्या फायद्यांविषयी(health benefits of korfad/aloevera) सविस्तर माहिती घेणार आहोत.
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो म्हणतात. कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध कोरफडीपासूनच बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
कोरफडमध्ये आवश्यक पोषक घटक, खनिजे, जीवनसत्त्वे आणि अमीनो अॅसिड असते. केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारे कोरफड वापरू शकता. आपण कोरफड तेल देखील वापरू शकता. कोरफडीचे तेल लावल्याने तुमच्या केसांना पोषण मिळते आणि केसांची वाढही चांगली होते. कोरफडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकविलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे. सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा गर हळद व सैंधव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.
कोरफड आणि पचनक्षमता:
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते, त्यामुळं आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पित्तशामक कोरफड:
कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासही मदत होते. कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील अन्न पचनासाठी उपयोगी बॅक्टेरियाची वाढ होते त्यामुळे अपचनामुळे होणारी ऍसिडिटी म्हणजेच पित्त कमी होते.
हि माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.