पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीत नेटाळी गाव परिसरात दुपारी ३.३० वाजाण्याचे सुमारास अरिहंत इंडस्ट्रिअल कॉर्पोरेशन लि. या खेळणी व वॉटर पार्क चे फायबर साहित्य बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनीला मोठी आग लागली असून दूरवरून देखील आगीचे लोळ दिसत आहेत. या स्फोटामध्ये व त्यामुळे लागलेल्या आगीमध्ये जखमी किंवा मृत व्यक्ती आहेत किंवा नाही याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनासथळी दाखल झाल्याअसून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोट झाला त्यावेळी कंपनी परिसरात नेमकी किती लोक होते तसेच हा स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.