पालघर: ‘त्या’ चिमुकल्याला शांती फाऊंडेशनने दिले जीवदान..!

0
403

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथील नमित सोनकर हा ट्रेनमध्ये वडापाव विकून कसंबसं कुटुंबाची गुजराण करणारा तरुण. या वडापाव विक्रेत्याच्या लहान मुलाला दोन महिन्याचा असल्यापासून हृदयात छिद्र होते. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे त्यांना हृदयशस्त्रक्रिया करणे म्हणजे अग्निदिव्यच होत. एवढी मोठी शस्त्रक्रिया आणि त्यासाठी येणार खर्च मोठा असल्याने त्याचे पालक हवालदिल झाले होते.

राज नमित सोनकर (वय 8 महिने राहणार वाणगाव) याची माहिती शांती फाऊंडेशनचे संचालक उज्ज्वल पाटील यांना कळताच त्यांनी या आजाराबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली असता हा आजार अतिशय जीवघेणा असून लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. उज्ज्वल पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्याला व्होखार्ड हॉस्पिटल मुंबई सेंट्रल मध्ये भरती केले. उज्ज्वल पाटील यांनी त्या मुलाच्या आईवडिलांना आधार देत, आपल्या शांती फाऊंडेशन मार्फत उपचाराचा सर्व खर्च करुन बाळाला सुखरूप घरी घेऊन येण्याचे आश्वासन दिले आणि डॉक्टरांना त्वरित उपचारास सुरु करण्यास सांगितले.

TAPVC Repair with Balloon Atrial Septestomy (हृदयातील छिद्रे बलून च्या साहाय्याने बंद करण्याची शस्त्रक्रिया) या शस्त्रक्रियेकरिता साधारण ७ लाख पन्नास हजार रुपये खर्च आला असुन हा सर्व खर्च शांती फाऊंडेशनच्या पुढाकाराने आणि सचिन पाटील, मा. उपाध्यक्ष जिल्हा परिषद व सुमीत ठाकूर, सरपंच नांदगाव यांच्या साहायाने करण्यात येणार आला आहे. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि राज सुखरूप घरी परतला तेव्हा त्याचे आई वडिलांचे चिंतायुक्त अश्रु, आनंदाश्रूत बदलले हीच आपल्या पुढील कार्यासाठी मोठी प्रेरणा आहे असे उज्ज्वल पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here