पालघर प्रतिनिधी – विनायक पवार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे उल्लंघन करून बोईसर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अल्युर स्पा अँड सलून मध्ये शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जनरेटरच्या धुरात कोंडुन चार जण बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना तातडीने बोईसर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

या घटनेची माहिती पत्रकारांनी शनीवार व रविवार या दिवशी प्रसिद्ध केल्यानंतर स्पा अँड सलूनचा मालक व त्याच्या मित्रा कडून पत्रकार प्रमोद तिवारी यांना फेसबुक व फोनवरती धमक्या देऊन तुम्हाला आम्ही बघून घेतो अश्या भाषेत शिवीगाळ करून धमक्या देण्यात आल्या. याबाबत काही पत्रकार संघटनेने निषेध व्यक्त करत अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही असे पत्रकार संघाकडून धमक्या देणाऱ्यांना सांगण्यात आले.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असे अवैद्य स्वरूपाचे धंदे बोईसर मध्ये सुरू असून जिल्हाधिकारी कारवाई करणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पा अँड सलून चालवणाऱ्या मालकाचे पालघरमधील एका माजी मंत्री व आताच्या विद्यमान पदावर आसलेल्या नेत्याचे ऋणानुबंध असल्याने त्या नेत्यांच्या बळावर पत्रकारांना धमक्या देत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

स्पा मध्ये घड़लेल्या घटनेमध्ये मालक धनश्री संखे (वय.35) यांच्यासह युसुफ शेख (वय.25), योगिता वेलणकर (वय.23), प्रभा (वय.38) बेशुद्ध पडले होते. शेजारच्या दुकानदाराला संशय आल्याने त्याने शटर उघडून पहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. संबधित स्पा अँड सलूनवर बोईसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here