मुंबई ई न्यूज वेब टीम:मासिक पाळी म्हंटल की पोटदुखी आणि थकवा यामुळे अनेकवेळा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पडते. पाळीच्या दिवसात पोटाखालच्या भागात(ओठी पोटात) आणि कंबरेत दुखणं हि तशी सामान्य बाब आहे. या वेदनेचं कारण गर्भाशयाजवळून निघणारा प्रोस्टेग्लेंडाइन नावाचा हा हार्मोन आहे. यामुळे गर्भाशयात रक्ताची कमतरता निर्माण होते ज्यामुळे स्नायुंमध्ये खुप वेदना होतात. बहुतांश स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात. पण हे पेनकिलर घेण्यापेक्षा तुम्ही काही घरगुती उपाय करून वेदनेपासून आराम मिळवू शकता. मासिक पाळीत प्रत्येकीला जाणवणाऱ्या वेदना या कमी जास्त असू शकतात. त्यामुळे तुमच्या त्रासानुसार तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
मासिक पाळी पोट दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Menstrual Pain):
- दिवसात पुरेशी किमान ८ तास झोप झोप घ्या. कारण नीट झोप झाली. तरच शरीराला आराम मिळतो. आणि वेदना कमी होतात.
- नारळपाणी प्यायल्याने कमरेला आराम मिळतो. आणि पोटदुखी नियंत्रणात राहते.
- पाळीच्या दिवसांमध्ये चहा कॉफीचे सेवन कमी करावे.
- शक्यतो पाळीमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्याकरीता गोळ्या घेणे टाळा. गोळ्या घेतल्याने पाळी सुरू असताना स्त्राव कमी होण्याची शक्याता असते. आणि आरोग्यावर त्याचा वाईट परीणाम होतो.
- मासिक पाळी सुरू होण्याआधी, मासिक पाळी सुरू झाल्यावर काही दिवस कोमट पाणी प्या. ज्यामुळे तुमचे पोट दुखणे कमी होईल.
- ओटीपोटातील स्नायू डिहायड्रेशनमुळेही ताणले जाऊ शकतात. दिवसभरातुन दहा ते बारा ग्लास पाणी प्या.
- पाळी सुरू असताना त्या ५ दिवसात आरामदायक कपडे वापरा. अती घट्ट कपडे वापरल्यामुळे तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो.
- पॅड्स वेळच्या वेळी बदला. जर बराच वेळ पॅड बदलला नाही तर ईन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
- पाळीच्या दिवसांमध्ये गोड-नमकीनचं पदार्थांचं सेवन कमी करा. गोड – नमकीन पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा त्रास वाढतो… तसंच यामुळे सुस्तीही वाढते.
- पोट दुखी कमी करण्यासाठी ४ काळीमिरी, एक मोठी वेलची, २-३ आल्याचे तुकडे घेऊन त्याचा कूट करून घ्या… हे मिश्रण उकळून घ्या, उकळल्यानंतर कोमट असतानाच हा काढा घ्या…
- तेजपत्याचा काढा: तेजपत्याची काही पानं बारीक करून घ्या. आणि पाण्यात उकळून घ्या, हा काढा घेतल्यानंतर तुमची पोटदुखी कमी होऊ शकेल.
- गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट शेकल्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. यामुळे ओटीपोटाजवळील रक्ताभिसरण सुधारते आणि तुमच्या ओटीपोटातील वेदना कमी होतात.
- पोटाला तेलाने मसाज करा, तुम्ही पोटाला इसेंशिअल ऑईल अथवा नारळाच्या तेलाने मसाज करू शकता. मसाज केल्यामुळे तेल तुमच्या त्वचेत मुरते आणि पोटातील स्नायूंना रिलॅक्स करते. मसाज करताना जोरजोरात पोटावर रगडू नका. हलक्या हाताना गोलाकार मोशनमध्ये पोटाला मसाज द्या.
- योगासने, एरोबिक्स व्यायाम, चालणे, सायकल चालवणे अशा व्यायाम प्रकाराची सवय लावा. आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावली तर मासिक पाळीचा हा त्रास नक्कीच कमी होईल. मात्र पाळीच्या काळात शरीराला आराम द्या.
- कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये काही काळ डुंबणे तुम्हाला नक्कीच आराम देईल.
- मासिक पाळीच्या काळात फळं, फळांचे रस, पालेभाज्या, आल्याचा रस, ओट्स , भरपूर पाणी, कॅल्शिअमयुक्त पदार्थ, दही असे पदार्थ खावे.
- रताळी खाल्ल्याने त्या दिवसांमधील वेदना कमी होतात. यातील अँटीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास लायक बनवतात.
- आपल्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करा. यातील कॅल्शिअममुळे पोटदुखी कमी होते.
- पाळीच्या दिवसात पपई खाल्याने होणारा प्रवाह नियंत्रीत होतो.
- कोरफड ज्यूस मधासोबत घेतल्याने या दिवसात होणाऱ्या वेदना कमी होतात आणि प्रवाहही नियंत्रीत राहतो.
- आपल्या पोटावर लवेंडर ऑईल लावल्यामुळे पोटदुखी आणि स्नायुंवरील ताण कमी होतो.
- पाळीच्या दिवसात शक्य तेवढा आराम करा. पुस्तके वाचा, संगीत ऐका. यामुळे आपल मन आनंदी राहील.
- पाळीच्या काळात हलके व्यायामप्रकार करा. घट्ट कपडेही शक्यतो टाळा. मीठाचे सेवन कमी करा. यामुळे वेदना कमी होतील.
मासिक पाळीच्या वेदना या नैसर्गिक असल्यामुळे तुम्ही यावर वर मासिक पाळी पोट दुखणे उपाय करू शकता. मात्र हे उपाय करूनही तुम्हाला असह्य वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.