पावसाळ्यात त्वचेची समस्या कशी टाळालं? काय आहेत उपचार…

0
586

मुंबई – योगेश चांदेकर :

डॉ. मधुलिका म्हात्रे, त्वचाविकार तज्ज्ञ सल्लागार वोक्हार्ट रूग्णालय मीरारोड

कडक उन्हाच्या झळामुळे अंगाची लाहीलाही झाल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस आता सुरू झाला आहे. पण पावसाळा ऋतू म्हटलं की, आजारपण आलचं. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जाणवणाऱ्या सतत ओलाव्यामुळे काहींना त्वचेच्या तक्रारीही सहन कराव्या लागतात.

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो. पावसात सर्वांत जास्त त्रास देणारा त्वचाविकार. पावसात चिखलाच्या पाण्यातून चालल्यामुळे पायाला बुरशी संसर्ग होऊ शकतो. याशिवाय अस्वच्छ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्वचाविकार होऊ शकतो. जे पाण्यात अधिक वेळ राहतात, पाय ओलसर ठेवतात, त्यांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. यात त्वचेला खाज उठणे, त्वचा लाल पडणे किंवा त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात.

डॉ. मधुलिका म्हात्रे यांनी दिलेल्या टिप्स खालीलप्रमाणे –

  • घरातील कुंड्यांमध्ये झाडे ठेवण्याचे टाळा, कारण यामुळे अलर्जी होऊ शकते
  • पाळीव प्राण्यांच्या जवळ जास्त जाणे टाळा
  • आपली त्वचा हायड्रेट करा- आंघोळीनंतर एक चांगले मॉइश्चरायझिंग क्रीम लावा, यामुळे आपल्या संवेदनशील त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार होतो आणि त्वचेला खाज येत नाही.
  • आपल्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी निरोगी संतुलित आहार घ्या
  • जास्त वेळ ओले कपडे परिधान करू नका
  • ओल्या चपला वापरू नयेत, यामुळे पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो.
  • बाहेरून आल्यावर लगेच आंघोळ करा
  • हातापायाची नखे कापावीत, त्यात माती अडकल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.
  • जर तुम्हाला गंभीर पुरळ उठत असेल तर लवकरात लवकर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण तुम्हाला तोंडावाटे अलर्जीविरोधी औषधांची आवश्यकता असू शकते.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेक रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. आपण खाल्लेल्या अन्नातून अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यातच आता पावसाळ्यात त्वचेची आणखी एक सामान्य समस्या म्हणजे बुरशीजन्य संसर्ग. त्यामुळे सैल कपडे घालण्याचा प्रयत्न करा. विशेषत: आंघोळ केल्यावर तुम्ही आपले शरीर पूर्णपणे कोरडे करून घ्या. त्वचेला खाज किंवा पुरळ उठत असेल तर तातडीने त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय किंवा औषध विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारची क्रिम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावणे टाळा. कारण, अनेक क्रिममध्ये ‘स्टिरॉइड्स’ असल्याने यामुळे त्वचेची समस्या वाढू शकते. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची समस्या जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नयेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here