पालघर : योगेश चांदेकर –
कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू झाला आहे. पालघर मधील वडराई खाडी लगत असलेल्या पानेरी नदीत मेलेल्या मास्यांचा खच दिसून आला आहे. मुळात नदीतील जलप्रदूषण वाढत असून, कारखान्यातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. तसेच अनेक रासायनिक कंपन्यांमधील पाणी प्रक्रिया न करताच थेट नदीत सोडले जात असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

कारखान्यांच रासायनिक सांडपाणी खुलेआम नैसर्गिक नाल्यात सोडलं जात असल्याने माशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दिवसेंदिवस पानेरी नदीत जलप्रदूषणाचा स्तर वाढतच चालला असल्याचे दिसत आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. आता यावर प्रशासन काय पाऊल उचलत हे पाहावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here