Mumbai E News Network: तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपासून २५० ते ३०० किलोमीटर इतके दूर आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आजपासून १७ तारखेपर्यंत राज्यावर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५० ते ८० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्यानं कोकण आणि डोगराळ भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे.

पूर्व मध्य आणि त्याच्याआसपासच्या अरबी समुद्राच्या अग्नेय दिशेकडच्या क्षेत्रावर घोंघावत असलेले तौक्ते चक्रीवादळ ११ किलोमीटर प्रतितास वेगानं महराष्ट्राच्या दिशेनं सरकलं आहे. हे वादळ सध्या पूर्वमध्य आणि त्याच्या आसपासच्या अरबी समुद्राच्या अग्नेय दिशेकडच्या क्षेत्रावर स्थिरावलं आहे. पुढच्या ६ तासात ते तीव्र चक्रीवादळात, तर त्यानंतरच्या १२ तासात अतितीव्र चक्रीवादळात परावर्तीत होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

येत्या मंगळवारपर्यंत ते त्याच्या सध्याच्या केंद्रापासून वायव्येला गुजरातच्या दिशेनेसरकेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

वादळामुळे दक्षिण भारत, गुजरातआणि पश्चिम राज्यस्थानाच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, केरळात अनेक ठिकाणी हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडेल तर बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामानविभागानं दिला आहे.

वादळाची संभाव्य तीव्रताआणि त्यापासूनच्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन भारताच्या हवाई दलानं १६ विमानं आणि १८ हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here