MUMBAI e NEWS :
जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा नेता अशी ओळख असलेले बच्चू कडू आता प्रशासनातील अधिकाऱ्यांवर वचक बसवताना दिसत आहेत. साताऱ्यातील जिल्हा परिषदेत विभागाची बैठक झाल्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी चर्चा केली. सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना लाभार्थ्यांची वाट न पाहता त्यांच्यापर्यंत पोहचवा, अशा सूचना महिला व बालविकास, शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, इ.मा.व, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी साताऱ्यात केल्या.

जर कोणत्याही अधिकाऱ्यांकडून सामान्य लोकांच्या कामाची फाईल थांबली तर त्या अधिकाऱ्याची सर्व्हिस थांबेल अश्या कडक शब्दात इशारा दिला आहे. ७ दिवसाच्या वर जर तक्रारीची फाईल थांबली तर त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई होईल हे हि त्यांनी स्पष्ट केले. मला कारवाई करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीत. माझं मंत्रिपद गेल तरी चालेल पण लोकांना मदत करण्यासाठी कोणी आडवे येत असेल तर त्याला मी खपवून घेणार नाही, असा दम अधिकाऱ्यांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here